Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • एआय मानवी क्षमतांना पूरक ठरवावे, पर्याय नव्हे – ब्रिजेश सिंह
Maharashtra

एआय मानवी क्षमतांना पूरक ठरवावे, पर्याय नव्हे – ब्रिजेश सिंह

एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई | कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करताना मानवी क्षमतांना पर्याय निर्माण करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’चे सीईओ प्रवीण परदेशी, सर्विस नाऊच्या वरिष्ठ संचालक गरिमा बब्बर, ओपन टेक्स्टचे देश संचालक मनीष बलूजा, डेलॉइट इंडियाचे पार्टनर जय गुहा, गव्हकनेक्टचे संचालक फहीम हक तसेच केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासकीय कामकाजात एआयचा वापर आणि मसुदा

शासनाच्या कामकाजात एआयच्या वापराचे महत्व स्पष्ट करताना प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘महा एआय’ या स्थानिक पातळीवर होस्ट केलेल्या सर्वम मॉडेलचा अनुभव सांगितला. मसुदा तयार करताना या मॉडेलची मदत घेतली जाते. शासन निर्णय, पूर्वीचे संदर्भ, प्रशासकीय तरतुदी, खर्चाच्या मर्यादा आणि विविध भाषांमधील जनसंपर्काचे स्वरूप यांची माहिती उपलब्ध असल्यामुळे या प्रणालीने उपयुक्त मसुदा तयार करून दिला. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना संदर्भ शोधणे आणि प्राथमिक मसुदा तयार करणे अधिक सुलभ होऊ शकते. तथापि, अंतिम मसुद्याची पडताळणी आणि मान्यता ही अधिकाऱ्यांनीच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटायझेशनपासून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंतच्या भारताच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी आधार, यूपीआय आणि डिजीयात्रा यांसारख्या सुविधांचे उदाहरण दिले.

एआयचे धोके आणि जबाबदार सुशासन

एआयच्या वापरातील संभाव्य धोके स्पष्ट करताना त्यांनी ऑस्ट्रेलियातील ‘रोबोडेब्ट’ प्रकरणाचा उल्लेख केला. कल्याणकारी योजनांमधील लाभार्थ्यांची स्वयंचलित पडताळणी करताना एआय प्रणालीतील त्रुटींमुळे चुकीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आणि अखेर ही प्रक्रिया बंद करावी लागली. त्यामुळे महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय पूर्णपणे एआयवर सोपविणे धोकादायक ठरू शकते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘महा क्राइम ओएस’ या प्रायोगिक उपक्रमाची माहिती देताना त्यांनी गुन्हेगारीच्या घटनांमधील वाहनचोरी, घरफोडी, पाकीटमारी यांसारख्या गुन्ह्यांच्या कार्यपद्धतींचे विश्लेषण एआयच्या मदतीने करता येऊ शकते असे सांगितले. भाषणाचा शेवट करताना त्यांनी, ‘एआयचा वापर जबाबदारीने, जोखमींचे मूल्यमापन करून आणि सार्वजनिक हिताला केंद्रस्थानी ठेवून करणे, हाच एआय सुशासनाचा मूलमंत्र आहे,’ असे स्पष्ट केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts