Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • तंत्रज्ञानामुळे मुंबई पोलीस दल अधिक लोकाभिमुख व पारदर्शक होणार
Maharashtra

तंत्रज्ञानामुळे मुंबई पोलीस दल अधिक लोकाभिमुख व पारदर्शक होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई पोलिसांच्या तंत्रज्ञान प्रकल्पांचे लोकार्पण करताना

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानसंवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स व्हॅन, टॅब्लेट वितरण, मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली आणि सिटीझन ॲपच्या माध्यमातून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करणे व नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

नवे तंत्रज्ञान आणि डिजिटल पोलिसिंग

‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाईत गुणात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्याधुनिक अँटी-नार्कोटिक्स व्हॅनचे लोकार्पण केले. अँटी-नार्कोटिक्स सेलच्या ताफ्यातील या नवीन फॉरेन्सिक वाहनाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला. तसेच एआयच्या मदतीने ‘तपास सारथी’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे. नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने ‘हॅश व्हॅल्यू’च्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया ‘एंड-टू-एंड डिजिटल’ करण्यावर भर दिला जात आहे. सीसीटीव्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, डेटा डिक्रिप्शन आणि सोशल मीडिया विश्लेषण करून गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस दलाची डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

लोकार्पण केलेल्या प्रमुख सेवा आणि सुविधा

या कार्यक्रमात विविध तंत्रज्ञानाधारित सुविधांची सुरुवात करण्यात आली. यामध्ये Digi ID स्मार्ट कार्डचा समावेश असून हे मुंबई पोलिसांची अधिकृत ओळख करून देणारे स्मार्ट ओळखपत्र आहे. तसेच पोलिसांच्या विविध अधिकृत ॲप्लिकेशनचा वापर करण्यासाठी सर्व अंमलदार व अधिकारी यांना दैनंदिन कामकाज अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी टॅब्लेटचे वितरण करण्यात आले. अंमली पदार्थविरोधी कारवाई आणि तपास अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक तपास वाहन (Anti-Narcotics Investigation Van) दाखल करण्यात आले. पोलीस दलातील विविध कामकाज एकाच डिजिटल प्रणालीद्वारे अधिक सुलभ आणि समन्वयपूर्ण करण्यासाठी मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली (MPIS) सुरू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा व सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेता यावा यासाठी सिटीझन ॲपची सुविधा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, विविध कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापक व अधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts