Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५० जागा वाढल्या
Nashik

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५० जागा वाढल्या

नाशिक | वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नाशिकमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेमध्ये ५० जागांची वाढ करण्यात आली आहे.

प्रवेश क्षमता ५० वरून थेट १०० वर

नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) या वाढीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे या महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता ५० वरून थेट १०० वर पोहोचली आहे. या निर्णयामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय, पदव्युत्तर एमडी आणि एमएस अभ्यासक्रमाच्या तीन नवीन जागांची देखील भर पडली आहे. सध्या हे महाविद्यालय न्यू बिटको रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून कार्यरत आहे.

मेरी परिसरात स्वतंत्र इमारत उभारण्यास मान्यता

वाढत्या विद्यार्थीसंख्येच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. मेरी परिसरात महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नवीन जागांमुळे प्रवेशाची संधी वाढणार असून, त्यानुसार अध्यापक, रुग्णालयीन सुविधा आणि प्रशिक्षण व्यवस्था सक्षम करणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महाराष्ट्रातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एमडी आणि एमएसच्या १ हजार ६६ नवीन जागा वाढल्या असून, राज्यातील एकूण पदव्युत्तर जागा ७ हजार ६१५ झाल्या आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts