Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • सप्तशृंगी गडावर तरुणाची आत्महत्या, मृतदेह आढळला
Nashik

सप्तशृंगी गडावर तरुणाची आत्महत्या, मृतदेह आढळला

नाशिक | सप्तशृंगी गडावरील शितकड्यावरून उडी मारून एका तरुणाने आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राहुल भाऊराव सावळे (वय २७, रा. जामशेत, ता. कळवण, जि. नाशिक) असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. ६) रोजी सकाळी सुमारे १० वाजता भातोडे शिवारातील फॉरेस्ट जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. वणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

घर सोडल्यानंतर मित्राशी साधला होता संपर्क

प्राप्त माहितीनुसार, मृत तरुण राहुल हा मागील सुमारे १५ दिवसांपासून घराबाहेर राहत होता. कौटुंबिक कारणांमुळे तो घरातून निघून गेला असला, तरी कुटुंबीय त्याच्या सतत संपर्कात होते. गुरुवारी (दि. ५) रोजी त्याच्या मित्राने, धर्मराज दौलत बागुल याने राहुलला फोन केला होता. त्यावेळी राहुल सप्तशृंगी गडावर आल्याची माहिती मिळाली. मित्राने त्याची समजून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु तो काहीही न ऐकता तिथून निघून गेला. दरम्यान, गडावरील काही नागरिकांनी एका तरुणाला शितकड्याच्या दिशेने जाताना पाहिल्याची माहिती समोर आली आहे.

शोधमोहिमेदरम्यान गंभीर जखमी अवस्थेत आढळला मृतदेह

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राहुलचा शोध घेण्यात आला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांनी शेतकऱ्यांच्या पायवाटेने भातोडे शिवारातील फॉरेस्ट जंगल परिसरात पुन्हा शोध घेतला. यावेळी राहुल तिथे गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या हातापायांसह डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने त्याला खासगी रुग्णवाहिकेद्वारे वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार राहुलने शितकड्यावरून उडी मारल्याचा संशय आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts