Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक रिंगरोड अलाइनमेंटची तांत्रिक फेरतपासणी होणार, विभागीय आयुक्तांचे आश्वासन
Nashik

नाशिक रिंगरोड अलाइनमेंटची तांत्रिक फेरतपासणी होणार, विभागीय आयुक्तांचे आश्वासन

नाशिक | रिंगरोड अलाइनमेंटमधील तांत्रिक त्रुटींची फेरतपासणी करून अंतिम अहवाल शासनाला सादर केला जाईल. तसेच बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेदाम यांनी दिले. रिंगरोड आणि महामार्ग क्रमांक २९ मधील बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत सोमवारी (दि. २) ही बैठक झाली, जी सुमारे दोन तास चालली.

तांत्रिक त्रुटी आणि पर्यायी मार्गांवर चर्चा

बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निश्चित केलेल्या अलाइनमेंटमधील तांत्रिक त्रुटी, अनावश्यक वळणे, बाधित घरे, बागायती जमिनीचे नुकसान, उपलब्ध शासकीय रस्ते आणि पर्यायी मार्गांरबाबत सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी होईल असा व्यवहार्य पर्याय स्वीकारण्याची भूमिका मांडण्यात आली. गवळावाडी पर्यायी मार्गाचा तांत्रिकदृष्ट्या विचार करणे, शेतकऱ्यांचे घर वाचविणे, बागायती क्षेत्राचे नुकसान टाळणे आणि अनावश्यक वळणे कमी करणे या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. या सर्व आक्षेपांची स्वतंत्र तांत्रिक पडताळणी करून अहवाल शासनाला पाठविण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिले.

१५ गावांचे फेरमूल्यांकन आणि आठ दिवसांत कार्यवाहीची मागणी

रिंगरोड प्रकल्पातील सुमारे १५ गावांचे भूसंपादन निवादे अद्याप जाहीर झालेले नाहीत, ज्यामुळे जमिनीच्या फेरमूल्यांकानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडील उच्च दरातील खरेदी-विक्री व्यवहार आणि योग्य बागायत गुणांक विचारात घेऊन वाढीव मोबदला देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आठ दिवसांत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण गायकर यांनी केली. या बैठकीस दीपक हावणे, अक्षय कातड, सुदर्शन पाटील, पंकज खताळे, शिवाजीराव डांगळे, भारत पिंपळे, प्रवीण पाटील यांच्यासह बाधित गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts