Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला
Nashik

नाशिकमध्ये किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

नाशिक | जुन्या सिडकोतील तुळजा भवानी चौक परिसरात एका किरकोळ वादातून शेजाऱ्याने एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये पती, पत्नी आणि १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित हल्लेखोराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

शतापावली करताना घडला प्रकार

तुळजा भवानी चौक परिसरात सोमवारी (दि. २) रात्री ९.४५ च्या सुमारास संदीप निकम हे आपल्या घरासमोरील रस्त्यावर शतपावली करत होते. त्यावेळी शेजारीच राहणारा संशयित श्रावण राबडे याने काहीतरी कारण काढून निकम कुटुंबीयांशी वाद घातला. हा वाद वाढल्यानंतर संशयित श्रावण राबडे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने संदीप निकम (५०) आणि त्यांचा १७ वर्षीय मुलगा अर्णव निकम यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पिता-पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले.

पोलिसांकडून संशयितास अटक

पती आणि मुलाला वाचवण्यासाठी मानसी निकम या धावून गेल्या असता, संशयित श्रावण राबडेने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पती-पत्नी आणि मुलगा असे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थल दाखल झाले. मानसी निकम यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित हल्लेखोर श्रावण राबडेला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी करत आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts