Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
Maharashtra

टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

ट्रूनॅट क्वात्रो आण्विक निदान यंत्र आणि आरोग्य उपकरणे

मुंबई | क्षयरोगाचे जलद आणि अचूक निदान करून राज्य टीबीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्याच्या दुर्गम व ग्रामीण भागांतील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने ३०० अत्याधुनिक ‘ट्रूनॅट क्वात्रो’ आण्विक निदान यंत्रे बसवली जाणार आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हास्तरीय आरोग्य संस्थांमध्ये या यंत्रांची स्थापना केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या या उपकरणांमुळे क्षयरोगाचे निदान लवकर होण्यास मदत मिळणार आहे.

त्रिपक्षीय करार आणि प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ४१.९२ कोटी रुपये असून प्रकल्पाचा कालावधी २१ महिन्यांचा आहे. या महत्त्वाच्या उपक्रमासाठी बीपीसीएल फाउंडेशन, कार्यान्वयन संस्था म्हणून एचआयटीईएस–एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेड आणि सहसंचालक, आरोग्य सेवा (क्षयरोग व कुष्ठरोग) यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार संपन्न झाला आहे. या माध्यमातून दुर्गम आणि ग्रामीण भागांपर्यंत आधुनिक निदान सुविधांचा विस्तार केला जात आहे. हे ‘ट्रूनॅट क्वात्रो’ यंत्र पोर्टेबल आणि बॅटरीवर चालणारे असल्यामुळे दुर्गम भागांत सहज वापरता येणे शक्य आहे. या यंत्रांद्वारे फक्त एका तासात क्षयरोगासह रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरोगाचे निदान करता येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना ही यंत्रे हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून निक्षय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण कामकाजाचे डिजिटल निरीक्षण केले जाईल.

तपासणी क्षमता आणि रुग्ण शोध

या नव्या प्रकल्पामुळे राज्यामध्ये दरवर्षी सुमारे ९ लाख ३६ हजार तपासण्या करण्याची मोठी क्षमता निर्माण होणार आहे. यातून अंदाजे १ लाख १२ हजार क्षयरुग्ण आणि ४ हजार ६८० रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून काढणे शक्य होईल. निदानामध्ये होणारा विलंब यामुळे कमी होईल, ज्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत मिळणार आहे. तसेच ग्रामीण व वंचित भागांतील नागरिकांना अतिशय सुलभ आणि आधुनिक स्वरूपाची आरोग्यसेवा उपलब्ध होईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts