Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे ‘डी-ब्रीफिंग’
Nashik

नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे ‘डी-ब्रीफिंग’

नाशिक | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नुकत्याच झालेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या VVIP दौऱ्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘ब्लू बुक’मध्ये निश्चित केलेल्या सुरक्षा आणि प्रोटोकॉलविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार दौऱ्यानंतर आढावा घेण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यानुसार नाशिकमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या समन्वयातून डी-ब्रीफिंग बैठक घेऊन संपूर्ण दौर्याचा आढावा घेतला जाणार आहे.

प्रोटोकॉल आणि सुरक्षाव्यवस्थेची तपासणी

राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग, विद्युत विभाग आणि प्रोटोकॉल विभाग यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन झाले किंवा नाही, याची तपासणी डी-ब्रीफिंग बैठकीत केली जाणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी कोणते अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार होते, त्यांची यादी निर्धारित प्रक्रियेनुसार पाठवली होती का, स्वागत, व्यासपीठावरील आसन व्यवस्था आणि शिष्टाचारांचे पालन झाले का, तसेच खर्चाचा तपशील तपासला जाईल. याशिवाय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, मार्गाची सुरक्षितता, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचालींचा आढावा घेतला जाणार आहे.

गर्दी व्यवस्थापन आणि आगामी सिंहस्थ

सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी २०१२ च्या कुंभमेळ्यानंतर २०१३ मध्ये आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात नाशिकमधील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरातील गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांचा समावेश आहे. राष्ट्रपतींच्या दौरैनंतर होणाऱ्या या बैठकीनिमित्त या दोन्ही तीर्थक्षेत्रातील गर्दी व्यवस्थापनाचा आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणात आलेल्या अडचणी, नियोजनातील त्रुटी आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणाऱ्या सुधारणांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. आगामी पर्वणीच्या दृष्टीने हा आढावा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून सर्व यंत्रणांच्या कामांची या माध्यमातून छाननी केली जाईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts