Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल
Nashik

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक | सिंहस्थ कुंभमेळा २०२७ निमित्त गोदाघाटवर धर्मध्वज मिरवणूक, धर्मध्वज ध्वजारोहण सोहळा आणि गोदाआरती या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना साधु-महंत, व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, राजनीतिक नेते तसेच नागरिक उपस्थित राहणार असल्याने गर्दीचे नियोजन, वाहतूक कोंडी टाळणे आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. पोलिस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी ही अधिसूचना जारी केली असून, ३० ऑक्टोबरला धर्मध्वज मिरवणूक आणि ३१ ऑक्टोबरला धर्मध्वज ध्वजारोहण सोहळ्यासाठी विविध मार्गावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. गोदाआरती कार्यक्रमासाठीही काही मार्गावर प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

३० आणि ३१ ऑक्टोबरचे वाहतूक बदल

अधिसूचनेनुसार ३० ऑक्टोबर रोजी तपोवन मैदान ते आव्हाड लॉन्स, टी-कॅर्नर ते तपोवन क्रॉसिंग, पंचवटी परिसरातील काठ्या मारुती चौक ते देवी चौक, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, अशोकस्तंभ ते रविवार कारंजा, टिळक पथ ते धुमाळ पॉइंट आणि मालवीय चौक ते मखमलाबाद नाका परिसरातील मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धर्मध्वज ध्वजारोहण सोहळा व गोदाआरती कार्यक्रमासाठी अशोकस्तंभ ते रविवार कारंजा, रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड, मखमलाबाद नाका ते रामकुंड, शनी चौक ते रामकुंडाकडे जाणारा मार्ग, रामसेतू पुलावरून जाणारा मार्ग आणि गोदाघाट परिसरातील अधिसूचित प्रवेशमार्ग बंद असणार आहेत. आपत्कालीन वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

वाहतूक पोलिसांनी नागरिकांसाठी दिंडोरी नाका – पेठ नाका सिग्नल – मखमलाबाद नाका – गोदापार्क – गजानन पेट्रोल पंप – चोपडा लॉन्स – गंगापूर नाका – इंद्रप्रस्थ यासह सीबीएस, अशोकस्तंभ आणि पेठ नाका ते मिर्ची चौक सिग्नलपर्यंतचे पर्यायी मार्ग सुचवले आहेत. तसेच संभाजी महाराज गार्डन गंगापूर रोड परिसर, अशोकस्तंभ परिसर, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, बी. डी. भालेकर मैदान आणि पंचवटीतील शिंदे मळा येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा आणि रविवार कारंजा ते शालिमारसह अनेक परिसर नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts