Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • बिबट्याशी झुंज देणाऱ्या लाडक्या शवानाचा अंत, वन्हे परिवाराकडून दशक्रिया विधि
Nashik

बिबट्याशी झुंज देणाऱ्या लाडक्या शवानाचा अंत, वन्हे परिवाराकडून दशक्रिया विधि

नाशिक | येवला तालुक्यातील नगरसूल येथील वन्हे परिवाराने आपल्या लाडक्या शवानाचा दशक्रिया विधी केला आहे. गेल्या १३ ते १४ वर्षांपासून कुटुंबातील सदस्यासारखा सांभाळलेल्या आणि संकटाच्या काळात प्राणांची बाजी लावून मालकाचा जीव वाचवणाऱ्या ‘पिल्लू’ नावाच्या शवानाचा बिबट्याशी झुंज देताना अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण वन्हे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बिबट्याशी झुंज आणि थरारक घटना

मेंढपाळ श्रावण आसाराम वन्हे यांचा परिवार नेहमी मेंढ्यांच्या संगोपनासाठी रानावनात मुक्कामास असतो. शुक्रवारी (दि. १६) त्यांचा कळप कोपरगाव – टाकळी शिवारात मुक्कामी होता. चोहोबाजूनी उसाने वेढलेल्या शेतात सुमारे दोनशे मेंढ्या, एक गाय आणि वन्हे परिवारातील सदस्य वास्तव्यास होते. मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर हल्ल्याचा प्रयत्न केला. बिबट्याची चाहूल लागताच, गेल्या अनेक वर्षांपासून परिवाराची राखण करणारा लाडका कुत्ता ‘पिल्लू’ कोणतीही भीती न बाळगता जोराजोरात भुंकत थेट बिबट्याच्या अंगावर धावला. मालकाचे कुटुंब आणि मेंढ्यांच्या रक्षणाइसाठी त्याने जिवाची बाजी लावत बिबट्याशी लढा दिला. मात्र बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी वन्हे परिवाराने परिसरात शोधाशोध केली असता पिल्लूचा मृतदेह सापडला नाही.

मुलासारखा सांभाळ आणि आठवणी

गेल्या १३ ते १४ वर्षांपासून वन्हे कुटुंबाचा तो एक अविभाज्य घटक बनला होता. कोणीही सदस्य दुचाकीवरून बाहेर पडला, की पिल्लू एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्ट धरून मागे धावत सुतायचा आणि दुचाकीवर बसून सोबत जायचा. रानावनातील रोजच्या भटकंतीत तो सावलीसारखा कुटुंबासोबत असायचा. त्याच्या या बालिश व लाडक्या सवयी आणि आठवणींमुळे परिवार अक्षरशः सुन्न झाला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts