मुंबई | लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस, राजकुमारी सोफी आणि त्यांचे शिष्टमंडळ रविवारी (दि. २५ ऑक्टोबर, २०२६) रात्री मुंबईत आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
विमानतळावर स्वागत
या आगमनावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित अधिकारी
या स्वाप्रसंगी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, राजशिष्टाचार विभागाच्या सहसचिव रोहिणी जाधव आणि मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk









