मुंबई | लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस, राजकुमारी सोफी आणि त्यांच्या समवेत असलेले शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
या दौऱ्याच्या समाप्तीनंतर विमानतळावर झालेल्या या निरोपाच्या वेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांनी शिष्टमंडळाला निरोप दिला.
उपस्थित मान्यवर
राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी यांच्या या प्रयाण प्रसंगी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. तसेच, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनीही उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
या प्रसंगी राजशिष्टाचार विभागाच्या सहसचिव रोहिणी जाधव आणि मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे हे देखील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk






