Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा महापूर, कुशावर्त परिसरात गर्दी
Nashik

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा महापूर, कुशावर्त परिसरात गर्दी

नाशिक | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर, रविवारी त्र्यंबकेश्वरी भाविकांचा महापूर लोटला. व्हीआयपी बंदोबस्तामुळे लागू असलेले कडक निबंध शिथिल झाल्यानंतर १० हजारांहून अधिक भाविकांनी कुशावर्त तीर्थावर पवित्र स्नानासाठी आणि त्र्यंबकराज्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

प्रतिबंध शिथिल झाल्यानंतर भाविकांची गर्दी

राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मार्गांवर पांढरे पडदे लावून विकासकामे झाकण्यात आली होती. स्थानिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्याने कुशावर्तावरील स्नान आणि मंदिरातील दर्शन सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. हा सोहळा पार पडताच त्र्यंबककरांसह दूरवरून आलेल्या भाविकांनी कुशावर्त तीर्थ व मंदिराकडे धाव घेतली. पवित्र कुशावर्तात डुबकी मारून भाविकांनी पुण्य पदरी पाडून घेतले. भाविकांच्या या ओघांमुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेले बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत.

बाजारपेठेत उडाली लगबग व नव्या घाटांवर गर्दी

फूलविक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि इतरांनी दुकाने उघडल्याने मंदिर परिसर पुन्हा गजबजला. दिवाळीचा माहोल असल्याने खरेदीसाठीही नागरिकांची मोठी लगबग दिसून आली. दरम्यान, ऐतिहासिक कुशावर्त तीर्थावर जागा मर्यादित असल्याने प्रशासनाने पेगलवाडी येथील प्रयागराज तीर्थानजीक गोदावरी पात्रात नवीन घाटांची निर्मिती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नवीन घाटांवर ध्वजारोहण झाल्यामुळे या जागेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विकासाची कामे प्रगतीपथावर असली, तरी भाविकांनी या नव्या घाटांवर स्नानासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts