Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वज फडकवला
Nashik

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वज फडकवला

नाशिक | दक्षिणगंगा गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरनगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ‘धर्मध्वज’ फडकवण्याचा सोहळा पार पडला. कोटी Sनातनी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या पवित्र कुशावर्त तीर्थावर वेदोक्त मंत्रोच्चार आणि भक्तीच्या वातावरणात हा सोहळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती महास्वामीजी यांच्या सानिध्यात हा मंगलसोहळा संपन्न झाला. कुशावर्तावर धर्मध्वज फडकताच त्र्यंबकनगरीत ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्यात आला.

धार्मिक विधी आणि पूजा

शनिवारी सकाळपासूनच कुशावर्त परिसरात विविध आखाड्यांचे साधु-संत, वैदिक पुरोहित आणि भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमनानंतर संत-महंतांच्या चरणी वंदन करून स्वागत करण्यात आले. कुशावर्ताच्या पवित्र जलाचे अर्घ्य, मंत्रोच्चार आणि वैदिक रीतीनुसार विहित पूजन करण्यात आले. विश्वकल्याणकारी ठरावे यासाठी सामूहिक वैदिक संकल्प सोडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शंकराचार्य यांच्या हस्ते मुख्य ध्वजस्तंभ आणि धर्मध्वजाचे शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. गगनात भगवी पताका फडकताच अवघे वातावरण आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेले आणि गोदामातेची महाआरती करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती आणि नवीन घाटावर ध्वजारोहण

या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच विविध आखाड्याचे महामंडलेश्वर, महंत, जनप्रतिनिधी आणि प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. पुरोहित संघातर्फे राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक ताम्रपट प्रदान करण्यात आला. तसेच, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पेगलवाडी येथे प्रयागतीर्थाजवळ निर्माण करण्यात आलेल्या नवीन घाटावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts