Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • शालार्थ आयडी घोटाळ्यात १२ कोटींचा आकडा ओलांडत १२०० संशयित निष्पन्न
Nashik

शालार्थ आयडी घोटाळ्यात १२ कोटींचा आकडा ओलांडत १२०० संशयित निष्पन्न

महाराष्ट्र शिक्षण विभाग कार्यालय

नाशिक | राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाची व्याप्ती प्रचंड वाढली असून यामध्ये आतापर्यंत तब्बल १२०० संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. या गैरव्यवहारात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये सुमारे १६० कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) आणि पोलिसांमार्फत अत्यंत वेगाने सुरू असून अनेकांना अटक झाली आहे.

प्रमुख आरोपींना अटक आणि न्यायालयाचे निर्देश

नाशिकरोड पोलीस आणि विशेष तपास पथकाने या प्रकरणात आतापर्यंत प्रमुख संशयितांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संस्थाचालक दीपक गरुड, राजमोहन शर्मा, प्रशांत वाडीले आणि तुषार साळुंखे यांचा समावेश आहे. तसेच मालेगावातील स्वतंत्र बोगस शिक्षक भरती प्रकरणात कीर्ती पाथरे याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान सहकार्य न करणाऱ्या सुमारे १५० संशयित शिक्षकांची थेट पोलीस चौकशी सुरू करण्यात आली आहे. विदर्भातही नागपूर सायबर शाखा आणि एसआयटीने १२ हून अधिक जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिकसह राज्यभरात शाळांची कसून चौकशी

या गंभीर प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत पोहोचले असून नाशिक शहर आणि जिल्ह्यातील १२ शाळा संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातही ७४२ शाळांच्या संचिकांची एसआयटीमार्फत कसून तपासणी सुरू आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणात शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts