Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या रामकुंडावर फटाक्यांच्या रील्ससाठी तरुणांची हुल्लडबाजी
Nashik

नाशिकच्या रामकुंडावर फटाक्यांच्या रील्ससाठी तरुणांची हुल्लडबाजी

नाशिक | पंचवटी परिसरातील रामकुंड परिसरात लक्ष्मीपूजेच्या रात्री एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुणांनी एकमेकांच्या दिशेने फटाके व रॉकेट फेकत मोठी हुल्लडबाजी केली. सोशल मीडियावर रील तयार करण्याच्या नादात या तरुणांनी परिसरातील नागरिक आणि वाहनांच्या सुरक्षेचा साधा विचारही केला नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

दिवाळीच्या रात्री तरुण पेटलेले फटाके आणि रॉकेट थेट एकमेकांच्या अंगावर फेकताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. हा सर्व प्रकार केवळ फटाके फोडण्यापुरता मर्यादित न राहता, त्याचे चित्रीकरण करण्यात आले आणि ‘पंचवटी फटाके वॉर’ या नावाने सोशल मीडियावर रील प्रसारित करण्यात आली.

नागरिकांकडून कारवाईची मागणी

रामकुंड परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असताना त्यांच्या अगदी जवळच हे फटाके व रॉकेट फेकण्यात आले. वाहनांवर किंवा इंधनाशी संबंधित भागांवर ठिणग्या पडल्यास मोठी आग लागण्याची किंवा अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने या प्रकारात कोणतीही हानी झाली नाही. या वायरल व्हिडिओची गंभीर दखल घेऊन संबंधित तरुणांची ओळख पटवावी, घटनेची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतापलेल्या नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेन्द्र पाटील यांनी माहिती दिली की, रामकुंडवर एकमेकांच्या अंगावर पेटलेले फटाके फेकण्याचा हा वायरल व्हिडिओ त्यांच्या हाती आला असून यासंदर्भात सखोल तपास सुरू आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts