Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये दुष्काळामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात, चिकन टंचाईची शक्यता
Nashik

नाशिकमध्ये दुष्काळामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात, चिकन टंचाईची शक्यता

नाशिक | यंदा नोव्हेंबर महिन्यातच निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईचा गंभीर फटका नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म व्यवसायाला बसला आहे. मनमाडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागांत अनेक पोल्ट्री फार्म बंद झाले आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तीव्र दुष्काळामुळे हा व्यवसाय धोक्यात आला असून, वेगाने पोल्ट्री फार्म बंद पडत असल्याने आगामी काळात चिकनची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाणीटंचाईमुळे पोल्ट्री फार्म बंद

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे बेभरवशाचे झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आणि सुशिक्षित तरुणांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन सुरू केले आहे. कांदा, द्राक्ष आणि डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आता पोल्ट्री फॉर्म्ससाठीही ओळखला जातो. अनेकांनी बँकेकडून कर्ज घेऊन हे व्यवसाय सुरू केले आहेत. मनमाड परिसरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत पोल्ट्री व्यवसाय जोरात होता. फार्मधारक कंपन्यांकडून पिल्लू आणून ४५ दिवसांत कोंबडी तयार करतात. मात्र यंदा पावसाअभावी विहिरी कोरड्या पडल्या असून पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या कमतरतेमुळे ४० टक्के पोल्ट्री फार्मधारकांनी पिल्लांची नवीन बॅच टाकणेच बंद केले आहे.

व्यापाऱ्यांची शासनाकडे मदतीची मागणी

नाशिक जिल्ह्यात एकूण १ हजार ८६२ पोल्ट्री फार्म असून, एका बॅचमध्ये ४ लाख ८६ हजार ८०३ कोंबड्या निघतात आणि एका वर्षात सुमारे ५ बॅचेस होतात. पोल्ट्रीधारक सागर खताळ यांनी सांगितले की, यंदा विहिरी कोरड्या पडल्यामुळे शेडमध्ये पक्षी टाकणे शक्य झाले नाही. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत व्यावसायिक आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांप्रमाणेच पोल्ट्री व्यावसायिकांनाही नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts