Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक महापालिका स्वीकृत नगरसेवक पद: राजकीय घडामोडींना वेग
Nashik

नाशिक महापालिका स्वीकृत नगरसेवक पद: राजकीय घडामोडींना वेग

नाशिक | महापालिकेच्या दहा स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी (दि. ४) अंतिम मुदत असताना पक्षात राडा बघायाला मिळत आहे. काँग्रेसची मागणी झुगारून लावत उबाठाने मंगळवारी (दि. ३) दोन उमेदवारांचे अर्ज आयुक्तांना सादर केल्याने नाराज झालेल्या काँग्रेसने बंडाचा झेंडा उगारला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्ती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपसह, शिंदेसेनेला दोन, तर उबाठा-काँग्रेसच्या संयुक्त गटाला दोन जागा मिळण्याचे समीकरण होते. मात्र, आता समीकरणेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उबाठा-काँग्रेस आघाडीत दुफळी आणि भाजपची सातव्या जागेसाठी धडपड

उबाठाने काँग्रेसची स्वीकृत नगरसेवकपदाची मागणी फेोटाळून लावत आपल्या वाट्याच्या दोन जागांसाठी बाबा गायकवाड आणि हेमंतकुमार गायकवाड यांची नावे निश्चित केली आहेत. त्यांचे अर्ज मंगळवारी (दि. ३) आयुक्त मनिषा खत्री यांना सादर देखील केले आहेत. यामुळे काँग्रेस नाराज झाली असून आघाडीत दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस नगरसेवक सुफि जीन यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा असून, पाठीमागच्या बदल्यात स्वीकृत नगरसेवकपदाची एक जागा मिळावी, अशी मागणी केल्याचे बोलले जात आहे. त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेतल्याची भी चर्चा आहे. या नाराजीचा फायदा घेऊन भाजप सातवी जागा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे काँग्रेसला गळाला लावून सातवी जागा पादत पाडून घेण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.

शिंदे गटाचा निर्णय आणि भाजपमधील इच्छुकांची संख्या

कोट्यातून दोन जागांसाठी इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी शिंदे गटाने स्वीकृत नगरसेवकपद एका वर्षासाठीच देण्याची भूमिका घेत येत्या चार वर्षांत स्वीकृत नगरसेवकपदावर आठ जणांना संधी देण्याची तयारी केली आहे. भाजपडे ७२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सहा जागांसाठी १५ इच्छुकांचे नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून बुधवारी सकाळी नावे पक्षाच्या गटनेत्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तिन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांना प्रत्येकी एका नावाची शिफारस करण्याची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. उर्वरित तीन नावाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनेतले पदाधिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.

Source: Cosmo News Desk

Related Posts