Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
Nashik

नाशिक महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

नाशिक | महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मुहूर्त अखेर ठरला असून महापालिका प्रशासनाने दहा सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. आगामी येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

पक्षीय संख्याबळ आणि जागांचे वाटप

झालेल्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपला सहा जागा मिळणार आहेत. यामध्ये रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच शिवसेना-मनसे आघाडीला दोन जागा मिळाल्या असून त्यात चंद्रकांत लवटे आणि विनायक आढाव यांना स्थान मिळाले आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-काँग्रेस आघाडीला दोन जागा मिळणार असून त्यात हेमंतकुमार गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांची नावे आहेत. या प्रक्रियेत काँग्रेसचा अर्ज छाननी समितीने नाकारला आहे.

न्यायालयाचे आदेश आणि पार्श्वभूमी

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली होती, ज्यामध्ये ३१ प्रभागांतून १२२ नगरसेवक निवडून आले होते. महापालिका अधिनियमानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहापेक्षा अधिक असू शकत नाही. या नियुक्ती प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सहा आठवड्यांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts