Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये दिवाळी खरेदीसाठी वाहतूक बदल, सात मार्गांवर प्रवेशबंदी
Nashik

नाशिकमध्ये दिवाळी खरेदीसाठी वाहतूक बदल, सात मार्गांवर प्रवेशबंदी

नाशिक | दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजनाची विशेष अधिसूचना जारी केली आहे. रविवार कारंजा, शालिमार, मेन रोड, सांगली बँक परिसरासह मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची आणि वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून, यासंदर्भात शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त (मुख्यालय / वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दि. ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत संबंधित मार्गांवर वाहतूक निबंध लागू राहतील. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे खरेदी करता यावी, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊ नये तसेच व्यापारी भागातील वाहतूक सुरळीत राहावी, हा या नियोजनामागील मुख्य उद्देश आहे.

प्रवेश बंद असलेले सात मार्ग आणि पर्यायी व्यवस्था

३ ते ११ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत मालवीय स्टँड ते रविवार कारंजांकडे जाणाऱ्या – येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. तसेच दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर भद्रकाली, बालाजी मंदिर ते गाडगे महाराज पुतळा, नेहरू चौक ते म. गां. रोड – मेन रोड – धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट आणि रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंटकडे जाणाऱ्या – येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गही सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार मालवीय स्टँड – मखमलाबाद नाका – रामवाडी – बायजाबाई छत्रपती – चोपडा लॉन्स – गंगापूर नाकामार्गे इच्छित स्थळी जाता येईल. पंचवटीकडून मेन मार्केटकडे येणारे वाहने संतोष टी पॉईंट, द्वारकामार्गे इच्छित स्थळी जातील. जुने नाशिक परिसरात जाण्यासाठी सीबीएसई – शालिमार – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल या मार्गाचा वापर करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.

वाहन पार्किंगची व्यवस्था

निबंधिट मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. दरम्यान, बाजारपेठ परिसर येथे येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन चालकांनी शालिमार येथील बी.डी. भालेकर मैदान, रविवार कारंजा, गाडगे महाराज पुतळ्याजवळील जागा आणि स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts