Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजला १.०७ लाखांहून अधिक स्पर्धकांची नोंदणी
Maharashtra

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजला १.०७ लाखांहून अधिक स्पर्धकांची नोंदणी

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज पत्रकार परिषद

मुंबई | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून महाराष्ट्र झोनमधून एकूण १ लाख ७ हजार ६०३ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी मंत्रालयातील विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर उपस्थित होते.

स्पर्धेची व्याप्ती आणि १० प्रमुख क्षेत्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र झोनमधून अर्ज आले आहेत. यामध्ये ७९ हजार १६२ संघांचा सहभाग असून ३२ हजार २५८ स्पर्धकांनी आपले प्रोफाइल पूर्ण केले आहे. तसेच ६ हजार १९२ महिला आणि १८ वर्षांखालील ४ हजार ५४९ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सामान्य प्रवर्गातून २१ हजार ५५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत १६ हजार ५७ नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या आहेत. ही स्पर्धा कृषी, कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकल्याण, नगरविकास, आरोग्य व वैद्यकीय सेवा, संरक्षण, शाश्वतता, पायाभूत सुविधा व वाहतूक, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच शिक्षण व रोजगारक्षमता अशा १० प्रमुख क्षेत्रांमधील ५० उपक्षेत्रांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे कार्यादेश

या स्पर्धेतील ५० विजेत्यांची निवड ५० उपक्षेत्रांमधून केली जाणार असून त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. यासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. युवकांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळवून देऊन त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी याद्वारे उपलब्ध होईल. याचबरोबर, विभागामार्फत सीएम महाफंड योजना, आयटीआय मधील अल्पकालीन व नवयुगीन अभ्यासक्रम तसेच राज्यस्तरीय समन्वय संस्था स्थापन करण्यासारखे विविध महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts