Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • प्रतिजैविक औषधांचा अयोग्य वापर रोखण्यासाठी फार्मासिस्टनी पुढाकार घ्यावा: प्रतापराव जाधव
Maharashtra

प्रतिजैविक औषधांचा अयोग्य वापर रोखण्यासाठी फार्मासिस्टनी पुढाकार घ्यावा: प्रतापराव जाधव

छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व उपस्थित मान्यवर

छत्रपती संभाजीनगर | प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक आणि अयोग्य वापर हे सार्वजनिक आरोग्यासमोर निर्माण झालेले एक गंभीर आव्हान असल्याचे मत केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयातील रुक्मिणी सभागृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात बोलत होते. जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ निमित्त भारतीय फार्मसी परिषद, एमजीएम विद्यापीठाचा औषधनिर्माणशास्त्र विभाग आणि वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय फार्मसी परिषदेचे अध्यक्ष डॉ. माँटू कुमार पटेल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिजैविक प्रतिकाराचे वाढते आव्हान

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी स्पष्ट केले की, अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिजैविक प्रतिकार ही केवळ एका रुग्णाची समस्या नसून ती संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी जोडलेली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, स्वतःहून उपचारपद्धती बदलणे किंवा उपचाराचा कालावधी पूर्ण न करणे यामुळे सूक्ष्मजीवांमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होते. यामुळे सामान्य संसर्गावर उपचार करणे देखील कठीण होऊन बसते. या समस्येवर मात करण्यासाठी शासन, भारतीय फार्मसी परिषद, शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय क्षेत्राने एकत्र येऊन समन्वяने काम करणे गरजेचे आहे. आरोग्याच्या क्षेत्रात फार्मासिस्ट हा रुग्ण आणि वैद्यकीय सेवा यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी नमूद केले.

फर्मासिस्टची भूमिका आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर

फर्मासिस्टनी प्रत्येक फार्मसी हे रुग्णांना योग्य माहिती व मार्गदर्शन देणारे विश्वासार्ह केंद्र बनवले पाहिजे, असे आवाहन मंत्र्यांनी केले. औषधांची गुणवत्ता, योग्य मात्रा, वापरण्याची पद्धत आणि संभाव्य दुष्परिणामांविषयी रुग्णांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी फार्मासिस्टनी पार पाडली पाहिजे. दरम्यान, भारतीय फार्मसी परिषदेचे अध्यक्ष डॉ. माँटू कुमार पटेल यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बी. फार्मा अभ्यासक्रमात क्लिनिकल फार्मसी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, एम. फार्मा विद्यार्थ्यांच्या जीपॅट शिष्यवृत्तीसाठी २०० कोटी रुपये आणि संशोधन केंद्रांसाठी ८० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमात परिषदेच्या वृत्तपत्रिकेचे अनावरणही करण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts