Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • सुरक्षित भारतासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे: मुख्यमंत्री फडणवीस
Maharashtra

सुरक्षित भारतासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे: मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रम

मुंबई | शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये बळकट करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे ‘गेट वे ऑफ इंडिया 26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सहभागावर भर देण्यात आला.

ग्लोबल पीस ऑनर्स पुरस्कार वितरण आणि मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमात उद्योगपती बालसुब्रमण्यन प्रभाकरन, आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी देविका रोटावन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, तसेच सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, करण जोहर, अक्षय कुमार, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कायद्याचा धाक किंवा युद्धाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, तर त्यासाठी सकारात्मक संवाद आणि परस्पर विश्वास आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रांतील योगदान

कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या श्रीगणेश वंदनेने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची मुलाखत घेतली, तर अभिनेता रणवीर सिंग यांनी सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेतली. याशिवाय अभिनेता शाहरुख खान यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. अमृता फडणवीस यांनी देशभक्तिपर गीते सादर केली, तर अभिनेता अक्षय कुमार आणि गायक सुखविंदर सिंग यांनीही आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. उपस्थितांनी २६/११ च्या हल्ल्यातील शहीद आणि शौर्य गाजवलेल्या पोलीस, कमांडो तसेच जवानांच्या योगदानाचे स्मरण केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts