Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • रामीच्या मातीत वीरपुत्र जयेश माळी यांना शासकीय इतमामात निरोप
Maharashtra

रामीच्या मातीत वीरपुत्र जयेश माळी यांना शासकीय इतमामात निरोप

वीरजवान जयेश माळी यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ

धुळे | देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले भारतीय सैन्यदलाचे जवान आणि धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र जयेश माळी यांना त्यांच्या जन्मभूमीत अश्रू पूर्ण निरोप देण्यात आला. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी देशसेवेसाठी प्राण अर्पण केले. शनिवारी सकाळी रामी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते आणि सैन्यदलाच्या वतीने त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. जयेश माळी हे भारतीय सैन्यदलातील ३५७ फील्ड हॉस्पिटलमध्ये शिपाई (नर्सिंग असिस्टंट) म्हणून कार्यरत होते. त्यांनी २ वर्षे ६ महिने सैन्यसेवा बजावली होती. मणिपूरमधील उखरूल पूर्व भागातील चालाऊ येथे कर्तўयावर असताना १८ नोव्हेंबर २०२६ रोजी लष्करी वाहनाच्या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणल्यानंतर ग्रामस्थ आणि नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले.

मान्यवरांची उपस्थिती आणि श्रद्धांजली

वीरजवान जयेश माळी यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संजय कुमार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील, आमदार राघवेंद्र भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील, नवी मुंबई बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरे, माजी अध्यक्षा धरती देवरे, तहसीलदार अरुण शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुषार देवरे, गटविकास अधिकारी नितीन खंडेराय, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण बोरसे आणि रामीचे माजी सरपंच दिलीप गिरासे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या दुःखाच्या प्रसंगी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पालकमंत्री जयकुमार रावल यांचे शोकसंदेश

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी ऑडिओ शोकसंदेशाद्वारे वीरजवान जयेश माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले की, अवघ्या २५ वर्षांच्या वयात मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना दिलेले सर्वोच्च बलिदान धुळे जिल्हा, महाराष्ट्र आणि देश सदैव स्मरणात ठेवेल. जयेश माळी यांनी अत्यंत कमी वयात देशसेवेचा मार्ग निवडून भारतमातेचे रक्षण करण्याचा निर्धार केला होता. त्यांचा त्याग आणि समर्पण तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील. संपूर्ण रामी गाव, धुळे जिल्हा आणि देश माळी कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Source: Cosmo News Desk

Related Posts