Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • सांगली जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रभावी नियोजन
Maharashtra

सांगली जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रभावी नियोजन

सांगली जिल्ह्यातील चारा टंचाई नियोजनांतर्गत जनावरांचे संगोपन व चारा लागवड

सांगली | संभाव्य चारा टंचाईच्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरांवर नियोजन करण्यात येत असून पशुपालकांना दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने चारा बियाणे वाटप, सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात चारा उत्पादन, शासकीय जमिनींवर चारा पिकांची लागवड, मुरघास निर्मिती, ऊस पाचट व इतर पीक अवशेषांचा चारा म्हणून वापर करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय पशुपालकांमध्ये चारा उत्पादनाबाबत जनजागृती, जनावरांचे लसीकरण आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी संपर्दा बीडकर यांनी दिली आहे.

चारा बियाणे वाटप आणि सिंचन क्षेत्राचा वापर

चारा उत्पादनाला चालना देण्यासाठी मका चारा बियाणे वाटpasमधे २ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला असून ६६.७२१ मे. टन बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात ५४१५ लाभार्थींना चारा बियाणे वाटप करण्याचे नियोजन असून याद्वारे ११८७७० मे. टन चारा उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२०२७ अंतर्गत ३ कोटी रुपयांची तरतूद करून ९०३५७ किलो चारा बियाणे १८ हजार ९६७ लाभार्थ्यांना वाटण्यात आले असून ४ हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड झाली आहे. सिंचन सुविधा असलेल्या ८ हजार ६७२ शेतकऱ्यांच्या रब्बी व उन्हाळी हंगामातील ८२८६.५४ एकर जमिनीचा वापर हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी करण्याचे नियोजन आहे.

शासकीय प्रक्षेत्र, मुरघास निर्मिती व पशुआरोगावर भर

भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुरघास निर्मितीवरही भर दिला जात असून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत तयार झालेले २ प्रकल्प व खाजगी ६ मुरघास प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ८०० मे. टन चारा पुरवठा होऊ शकतो. तसेच रांजणी व जत येथील शासकीय प्रक्षेत्रांवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. १ लाख ४२ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाचे वाडे, वनक्षेत्र व गायरान क्षेत्रातून चाऱ्याची उपलब्धता करण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी साखर कारखानदारांशी बैठक घेऊन ऊस तोडणी मजुरांमार्फत करण्याबाबत आवाहन केले आहे. याशिवाय चारा साक्षरता अभियानांतर्गत जनजागृती केली जात असून जनावरांचे लसीकरण आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts