Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या देवळा तालुक्यात बिबट्याचा हल्ला, तीन जनावरे ठार
Nashik

नाशिकच्या देवळा तालुक्यात बिबट्याचा हल्ला, तीन जनावरे ठार

नाशिक | देवळा तालुक्यातील वाखारी येथे बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे व एक गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. या सत्रामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रावण बागुल आणि माणिक आहेर यांच्या जनावरांवर हल्ला

वाखारी येथील कापराई शिवारातील शेतकरी श्रावण दगा बागुल यांच्या मालकीच्या गट नंबर १४/२१ मध्ये १७ रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार झाली. यानंतर दुसऱ्या दिवशी १८ रोजी रात्रीच्या वेळी याठिकाणी वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा घेत आहेर वस्ती येथील माणिक दादाजी आहेर यांच्या मालकीच्या गट नंबर १०१२ मध्ये बिबट्याने पुन्हा हल्ला चढवत गाईचा फडशा पाडला.

वन विभागाची पाहणी आणि पिंजरा बसवण्याची मागणी

सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या आदेशानुसार वन परिमंडळ अधिकारी श्रीमती डी.पी. चौधरी, वनरक्षक श्रीमती एस.बी. मरशिवणे आदी वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या परिसरात सतत होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे पशुधनाचे नुकसान होत असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts