नाशिक | नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची सुनावणी आज (दि. १९ नोव्हेंबर) पार पडली. या प्रकरणात एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांना ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नाशिक न्यायालयाकडून यापूर्वी जलील यांना समन्स बजावण्यात आले होते.
न्यायालयात सुनावणी आणि जामीन मंजूर
नाशिक न्यायालयामध्ये न्यायमूर्ती खारकर यांच्यासमोर इम्तियाज जलील यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या घडामोडीनंतर न्यायालयाने जलील यांचा जामीन अर्ज मंजूर केला. या घडामोडीमुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.
निदा खान हिच्या मदतीचा आरोप
या संपूर्ण प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या निदा खान हिला मदत केल्याचा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस जेव्हा निदा खानचा शोध घेत होते, त्यावेळी जलील यांनी तिला मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरूनच निदा खान हिला आश्रय दिल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.
Source: Cosmo News Desk






