Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • वांद्रे येथील नवनीत मोटर्सचे व्यवसाय प्रमाणपत्र ३० दिवस निलंबित
Maharashtra

वांद्रे येथील नवनीत मोटर्सचे व्यवसाय प्रमाणपत्र ३० दिवस निलंबित

वाहन नोंदणी नियम उल्लंघनासंदर्भात परिवहन विभागाचे कार्यालय

मुंबई | वांद्रे येथील मे. नवनीत मोटर्स या वाहन वितरकाचे व्यवसाय प्रमाणपत्र ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. वाहनाची नोंदणी होण्यापूर्वीच ग्राहकाला वाहनाचा ताबा दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, याबाबतचे आदेश परिवहन आयुक्तांनी जारी केले आहेत.

नोंदणीपूर्वीच वाहन ताb्यात दिल्याप्रकरणी कारवाई

परिवहन विभागाच्या चौकशीत मे. नवनीत मोटर्स यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी एमएच ०१ एफएम २२११ क्रमांकाचे वाहन नोंदणी होण्यापूर्वीच वाहन मालकाच्या ताब्यात दिल्याचे उघडकीस आले. या वाहनाचा मोटार वाहन कर १२ ऑक्टोबर रोजी भरण्यात आला होता, तर वाहनाची अधिकृत नोंदणी १६ ऑक्टोबर रोजी झाली. नियमानुसार वाहनाची नोंदणी झाल्यानंतर त्यावर उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. या प्रकरणी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित वाहन वितरकाची सुनावणी घेण्यात आली.

परराज्यात नोंदणी करणाऱ्यांवर विशेष मोहीम

महाराष्ट्रात वास्तव्य करणारे काही वाहनधारक राज्याचा मोटार वाहन कर बुडविण्याच्या उद्देशाने इतर राज्यांत वाहनांची नोंदणी करीत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. परराज्यात नोंदणी केलेली वाहने वारंवार महाराष्ट्राच्या रस्त्यांवर वापरताना आढळल्यास संबंधित वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. संबंधित वाहनधारकांनी नियमानुसार आपल्या वाहनांची महाराष्ट्र राज्यात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (आयटी) शैलेश कामत यांनी केले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts