Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • आदिवासी शेतकऱ्यांना ७ ई, १२ ई स्वामित्व पत्राचे वाटप
Maharashtra

आदिवासी शेतकऱ्यांना ७ ई, १२ ई स्वामित्व पत्राचे वाटप

आदिवासी शेतकऱ्यांना स्वामित्व पत्र देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर | नागपूर येथील नियोजन भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वनपट्टे मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते ७ ई व १२ ई स्वामित्व पत्राचे वितरण करण्यात आले. वनपट्टे वाटप केलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीची कायमस्वरुपी मालकी मिळत नव्हती, ज्यामुळे त्यांना जमिनीचे स्वामित्व मिळावे यासाठी शासनाने ७ ई व १२ ई स्वामित्व पत्र देण्याचा निर्णय घेतला असून याद्वारे राज्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांना लाभ होत आहे. आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा मालक करता आल्याचा आनंद असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी याप्रसंगी नमूद केले.

शासन निर्णय आणि विशेष मोहिम

वन विभागाच्या किंवा झुडपी जमिनीवरील पात्र आदिवासी लाभार्थ्यांना वनपट्टे दिले जातात, परंतु मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना शासकीय योजना, पिकविमा, पिककर्ज, फार्मर आयडी आणि नुकसान अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. केवळ जमिनीचे पट्टे आहेत पण प्रत्यक्षात लाभ मिळत नाही या समस्येची दखल घेऊन शासनाने स्वतंत्रपणे ७ ई व १२ ई स्वामित्व पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात येत्या १५ डिसेंबरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना ७ ई व १२ ई स्वामित्व पत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह निमित्त जास्तीत जास्त आदिवासी शेतकऱ्यांना स्वामित्व पत्र देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पारंपरिक शेतकऱ्यांना फार्मर आयडी

अनेक शेतकरी वर्षानुवर्षे परंपरेने जमिनीची वहिवाट करत आहेत परंतु त्यांच्याकडे जमीन मालकीचे पुरावे नाहीत. अशा जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०१५ पूर्वीचा जमीन कसत असल्याचा कोणताही पुरावा सादर केल्यास त्यांना देखील फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारे जमीन कसणारे जवळपास १५ लाख शेतकरी आहेत आणि या फार्मर आयडीमुळे त्यांना मोठा फायदा होणार असल्याचे महसूल मंत्री यांनी सांगितले. या वितरण सोहळ्याला राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल, आमदार डॉ. राजीव पोतदार, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि आदिवासी शेतकरी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts