Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • दिवाळीत नाशिकमध्ये १३ हजार ५३८ टन कचरा संकलित
Nashik

दिवाळीत नाशिकमध्ये १३ हजार ५३८ टन कचरा संकलित

नाशिक | दिवाळीनिमित्त घरांमध्ये झालेली साफसफाई, बाजारपेठांमधील खरेदी-विक्री आणि व्यावसायिक उलाढालीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा संकलनाच्या आकडेवारीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत नाशिककरांकडून तब्बल १३ हजार ५३८ टन कचरा निर्माण झाल्याची नोंद झाली आहे. २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हा कचरा गोळा करण्यात आला असून यादरम्यान कचरा संकलनाच्या प्रमाणात विविध दिवसानुसार चढ-उतार पाहायला मिळाले.

पंधरा दिवसांमधील कचरा संकलनाची आकडेवारी

मनपाच्या आकडेवारीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी शहरातून ९२३ टन कचरा संकलित करण्यात आला होता. यानंतर २९ ऑक्टोबरला ८९६ टन, ३० ऑक्टोबरला ८९२ टन आणि ३१ ऑक्टोबरला ८८९ टन कचऱ्याची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कचऱ्याचे प्रमाण पुन्हा वाढले असून २ नोव्हेंबर रोजी ९६१ टन कचरा गोळा झाला. या कालावधीत ४ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९६६ टन कचरा संकलित झाल्याची नोंद झाली. यानंतर ५ नोव्हेंबर रोजी ९५१ टन कचरा जमा झाला. पुढे ८ नोव्हेंबर रोजी ८७३ टन, ९ नोव्हेंबरला ८४२ टन, तर १० नोव्हेंबर रोजी वाढ होऊन ९१७ टन कचरा संकलित झाला. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी हे प्रमाण अचानक घसरून ७६२ टनांवर आल्याचे दिसून आले.

स्वच्छतेचा प्रश्न आणि दुर्गंधीची समस्या

दिवाळी संपल्यानंतर सुट्ट्यांचा माहोल असल्याने शहरातील स्वच्छताव्यवस्थाणावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये नियमित साफसफाई होत असली, तरी कॉलनी, नगरे आणि छोट्या सोसायट्यांमधील अंतर्गत रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अस्वच्छतेचे चित्र कायम आहे. अनेक भागांत रस्त्यांची झाडलोट नियमित होत नसल्याने मोकळ्या जागा, नाल्यांच्या कडेला आणि रस्त्यांच्या कोपऱ्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा वेळेवर न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. परिणामी, नागरिकांना या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts