Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर
Maharashtra

महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांचे छायाचित्र

मुंबई | महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रातील कामगिरीअंतर्गत राज्यातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांना अंतिम मान्यता मिळाल्याची माहिती दिली आहे. डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत लवकरच या समुद्रकिनाऱ्यांना अधिकृत ‘ब्लू फ्लॅग’ प्रदान केले जाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय निकष आणि पुरस्काराचे निकष

‘ब्लू फ्लॅग’ हा जगभरात मान्यता प्राप्त असलेला पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठीचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन या विविध निकषांच्या आधारे हा पुरस्कार प्रदान केला जातो. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन राज्यातील पर्यटनस्थळांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे.

कोकण पर्यटनाला मिळणार चालना

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला अंतिम पुरस्कार कोकणाच्या पर्यटन क्षमतेला जागतिक स्तरावर अधोरेखित करणारा आहे. यामुळे महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष वेढले जाण्यास मदत होणार असून कोकणातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित पूरक उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला सुमारे ८७८ किलोमीटर लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी या उपलब्धीवर आपली मनोगते व्यक्त करत राज्याच्या किनारपट्टी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा हा टप्पा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts