Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली महाराष्ट्र पर्यटन दालनाची भेट
Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली महाराष्ट्र पर्यटन दालनाची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पर्यटन दालनात पैठणी साड्यांची पाहणी करताना

मुंबई | गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि ‘भारत पर्व २०२६’ च्या निमित्ताने आयोजित उपक्रमात महाराष्ट्राचे विशेष पर्यटन दालन उभारण्यात आले आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली या दालनाची स्थापना करण्यात आली असून, या दालनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक हातमागावरील पैठणी साड्यांची पाहणी केली.

पैठणी विणकाम आणि हस्तकलेची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैठणी विणकामामागील कलाकुसर, पारंपरिक तंत्र, त्याचे बारकावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची माहिती जाणून घेतली. या माध्यमातून त्यांना महाराष्ट्राच्या पारंपरिक कला, हस्तकला, सांस्कृतिक वारसा आणि कारागिरांच्या कौशल्याचे दर्शन घडले. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा उपक्रम सुरू आहे.

पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन

या विशेष दालनात महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके आणि साहित्य उपलब्ध आहे. पैठणी विणकामाचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हस्तकलेच्या वस्तू हे या दालनाचे प्रमुख आकर्षण आहे. दादरच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम) च्या किचन स्टुडिओद्वारे महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे सादरीकरण होत आहे. पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव आणि संचालक विकास पानसरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts