Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंचा सत्कार
Maharashtra

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंचा सत्कार

उपमुख्यमंत्री सुनिता अजित पवार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार

बारामती | राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बारामती तालुक्यातील खेळाडूंचा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनिता अजित पवार यांच्याकडून गौरव करण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंनी पदके पटकावून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.

कुस्ती स्पर्धेतील यश

दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना बारामतीच्या दोन खेळाडूंनी पदकांची कमाई केली. यात कु. श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णयश संपादन केले. तसेच कु. समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.

खेळाडूंनी भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करून राज्य व देशाचा नावलौकिक वाढवावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.

बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरी

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. अनुष्का बापू कुतवळ हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभिनंदन सोहळ्याला नगराध्यक्ष सचिन सातव, संभाजी नाना होळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती तालुका दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, मलारी बंडलकर आणि सौरभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts