Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी साजरी केली दिवाळी
Maharashtra

वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी साजरी केली दिवाळी

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना मंत्री नितेश राणे

मुंबई | अपुऱ्या पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका शेतकरी वर्गासह मच्छीमार बांधवांना देखील सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्याला प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक मच्छीमार बांधवांसोबत दिवाळी सण साजरा केला आणि त्यांच्याशी संवाद साधला.

मच्छीमार कुटुंबांच्या अडचणींची घेतली माहिती

मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यातील अनेक मच्छीमार कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी शकुंतला तोंबरी आणि विजय तुका यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन अडचणी, त्यांच्या व्यवसायातील समस्या तसेच सध्याच्या परिस्थितीमुळे कुटुंबांवर आलेल्या आर्थिक अडचणींची सविस्तर माहिती जाणून घेतली.

शासनाकडून मदतीचा आणि योजनांचा लाभ घेण्याचे आश्वासन

दिवाळीच्या निमित्ताने मच्छीमार कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवत मंत्री नितेश राणे यांनी त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले. संकटकाळात शासन मच्छीमार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. तसेच, अडचणी सोडवण्यासाठी शासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे सांगत, मच्छीमार बांधवांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts