Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • मुख्यमंत्र्यांकडून शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी
Maharashtra

मुख्यमंत्र्यांकडून शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेताच्या बांधावर उभे राहून पिकांची पाहणी करत आहेत

नागपूर | पावसाअभावी शेतातील कापूस आणि तूर पिके सुकत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री लोहारी सावंगा या गावी मुक्कामी होते. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.

सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांच्या समस्या

लोहारी सावंगा येथून सकाळी सोनेगाव येथील शेतकरी दिलीप सरोदे यांच्या शेतात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दुष्काळामुळे कापूस पिकाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. पावसाअभावी कापसाची वाढ झाली नसून बोंडेही फुटलेली नाहीत. शेतीचे नुकसान झाले असतानाच वन्य प्राण्यांचा मोठा त्रास होत असल्याने सौर कुंपण उपलब्ध करून देण्याची मागणी सरोदे यांनी केली, ज्यावर वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपणाची योजना प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथील शेतकरी बाबुराव काळे यांच्या शेताला भेट देऊन कापूस व तुरीच्या पिकांची पाहणी करण्यात आली. दीर्घकाळ पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तातडी मदत दिली असून उर्वरित मदतही खात्यात जमा केली जाईल आणि कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑफलाईन नोंदणीची सवलत आणि अन्नधान्य वाटप

दुष्काळी मदत देताना ऍग्री स्टॅकची नोंदणी आवश्यक असली, तरी या परिस्थितीत ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दुष्काळात आवश्यकतेनुसार धान्य मिळत असले, तरी शिधापत्रिका नसलेल्या शेतकऱ्यांची प्राधान्याने नोंदणी करून त्यांना लाभ देण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या पाहणी दौऱ्यात आमदार चरण सिंग ठाकूर, राजीव पोतदार, वसंतराव चापले, संदीप सरोदे, दिनेश दापले, सरपंच बिपीन चापले, नलिनी सतीश रेवतकर, मनोहर कुंभारे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts