Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी ‘एसएफएस’ पोर्टल सुरू, दादाजी भुसे यांची माहिती
Maharashtra

स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी ‘एसएफएस’ पोर्टल सुरू, दादाजी भुसे यांची माहिती

एसएफएस पोर्टल उद्घाटनादरम्यान ऑनलाइन उपस्थित असलेले अधिकारी व मंत्री

मुंबई | स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित विविध शासकीय सेवा आता ऑनलाइन उपलब्ध होणार असून, यासाठी शालेय शिक्षण विभागाने विकसित केलेल्या नवीन ‘एसएफएस’ (सेल्फ फायनान्स्ड स्कूल्स) पोर्टलचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या पोर्टलचा शुभारंभ झाला. या नवीन यंत्रणेमुळे शाळांना विविध सेवांसाठी अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जाच्या प्रक्रियेचा मागोवा घेणे सुलभ होणार आहे.

एसएफएस पोर्टलवरील १० महत्त्वाच्या सेवा

या नवीन डिजिटल पोर्टलमुळे शासकीय कामकाज अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक होईल असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. तसेच हे पोर्टल विकसित करणाऱ्या पथकाचे त्यांनी अभिनंदन केले. या पोर्टलवर मंडळ संलग्नता ना-हरकत प्रमाणपत्र, नूतनीकरण, दोन सत्रांतील शाळेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, शाळेचे स्थलांतर, शाळा व्यवस्थापनाचे हस्तांतरण, इयत्ता अकरावीसाठी अतिरिक्त तुकडी आणि शाखा परवानगी, मंडळ बदल, नाव व माध्यम बदलण्याची परवानगी, संलग्नता रद्द करणे आणि प्रवेशक्षमता वाढविणे अशा एकूण १० सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

शालेय गुणवत्तावाढीसाठी अधिकाऱ्यांना आवाहन

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना, शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आणि अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले. तसेच शालेय गुणवत्तावाढीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी दिली. या ऑनलाइन कार्यक्रमास शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सर्व संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts