Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे विविध महत्त्वाचे निर्णय जाहीर
Maharashtra

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे विविध महत्त्वाचे निर्णय जाहीर

मंत्रिमंडळ बैठक सुरू असल्याचे दर्शवणारे चित्र

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांमार्फत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयांमध्ये विद्यार्थ्यांच्या भत्त्यातील वाढ, न्यायालयांची स्थापना आणि विविध क्षेत्रांमधील सवलतींचा समावेश आहे.

पशुवैद्यकीय भत्ता आणि वाहतूक चलान सवलत

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आंतर्वासिता निर्वाह भत्यात सात हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता तो अठरा हजार रुपये होईल. यातील पंधरा हजार रुपये राज्य शासन देणार आहे. तसेच, नियमभंग केलेल्या वाहनांवरील थकीत दंड भरून वाहन दंडमुक्त करण्यासाठी ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून प्रलंबित दंडावर २० टक्के सवलत मिळणार आहे.

इतर महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात आली असून विभागीय स्तरावरील विद्यार्थ्यांना १५०० रुपये तर जिल्हा स्तरावर १३०० रुपये भत्ता मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, मोखाडा, विक्रमगड येथे ग्राम न्यायालये स्थापन करण्यास आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे स्वतंत्र वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts