Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थाचा शंखनाद आणि धर्मध्वजारोहण
Nashik

नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थाचा शंखनाद आणि धर्मध्वजारोहण

नाशिक | गोदावरीच्या पावन तीरावर वैदिक मंत्रांचा मंगलघोष आणि शंखनादाने दुमदुमलेल्या वातावरणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रारंभाचा ऐतिहासिक शंखनाद करण्यात आला. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या श्रद्धेच्या महापर्वामुळे अवघी नाशिकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

पवित्र विधी आणि संत-संतांची उपस्थिती

या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथम यज्ञकुंडात आहुती अर्पण केली. त्यानंतर जीवनदायिनी गोदावरीचे विधिवत पूजन करून त्यांनी धर्मध्वजेला वंदन केले. पुरोहितांच्या मंत्रघोषात त्यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाचा परममंगल क्षण साकारला गेला. ध्वजा आकाशात फडकताच शंखनादाने रामतीर्थाचा आसमंत दुमदुमला. या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच विविध आखाड्यांचे महंत, धर्माचार्य आणि साधू-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंहस्थ धर्मध्वजाची वैशिष्ट्ये आणि नियोजन

सिंहस्थ धर्मध्वजावर विविध शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ देण्यात आला आहे. या ध्वजावरील अमृतकुंभ अमरत्व, मुक्ती आणि देवी शक्तीचे प्रतीक आहे, तर ओमकार सकारात्मकता दर्शवतो. ध्वजावरील १२ रेशमी गोंडे सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या या धर्मध्वजारोहणाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला विशेष अधिष्ठान लाभले असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज होत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts