Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन संपन्न
Maharashtra

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन संपन्न

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेला सिंहस्थ ध्वजपूजन सोहळा

नाशिक | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजपूजन सोहळा पार पडला. धार्मिक व मंगलमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते विविध धार्मिक विधी संपन्न झाले. यामध्ये गौतमी गंगा गोदावरी पूजन, सिंहस्थ ध्वजपूजन, विशेष अर्घ्य अर्पण आणि गोदावरी आरतीचा समावेश होता. राष्ट्रपतींचे कुशावर्त येथे आगमन झाल्यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधींना सुरुवात झाली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि रोहयो व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल प्रमुख उपस्थित होते. तसेच आमदार गोकुळ गीते, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते.

धार्मिक विधी व सन्मान

वैदिक मंत्रघोषामुळे कुशावर्त तीर्थ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरेत गोदावरी नदीचे पवित्र स्थान असलेल्या कुशावर्त तीर्थाला विशेष महत्त्व आहे. या कार्यक्रमात पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीजी महाराज, विविध आखाड्यांचे साधू, महंत आणि स्थानिक राहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी पुरोहित संघाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानपूर्वक ताम्रपट प्रदान करण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts