Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ५९.८१ टक्के मतदान
Maharashtra

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ५९.८१ टक्के मतदान

नांदेडमधील मतदान केंद्रावर मतदान करताना नागरिक

नांदेड | ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील सर्व १२० मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात अंदाजे ५९.८१ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

मतदानाची वेळनिहाय आकडेवारी

जिल्ह्यात सकाळी ८ ते १० या वेळेत ७.५४ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत २१.२० टक्के, तर दुपारी २ वाजेपर्यंत ३७.४३ टक्के मतदान झाले होते. दिवस, जसजसा पुढे सरकला तसतसा मतदानाचा टक्का वाढत जाऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत तो ५९.८१ टक्क्यांवर पोहोचला. संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मतदार आणि प्रशासकीय सहभाग

जिल्ह्यातील मतदारयादीत एकूण ३६ हजार ६८७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी प्रत्यक्षात २१ हजार ९४२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २८ हजार ६९४ पुरुष मतदारांपैकी १८ हजार १८० पुरुषांनी, तर ७ हजार ९९० महिला मतदारांपैकी ३ हजार ७६१ महिलांनी मतदान केले. तसेच, तीन इतर मतदारांपैकी एका मतदाराने मतदान केले असून महिला मतदारांच्या तुलनेत पुरुष मतदारांचा सहभाग अधिक राहिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकाळी प्रतिभा निकेतन महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि यशवंत महाविद्यालय येथील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या आणि निवडणुकीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने यांच्यासह प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Tags:

Related Posts