Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात उपक्रम
Maharashtra

महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात उपक्रम

महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष निमित्त आयोजित कार्यक्रमांचे छायाचित्र

रायगड-अलिबाग | आधुनिक भारताचे समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्यभरात विविध दिशादर्शक आणि प्रेरणादायी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. समता, न्याय, शिक्षण आणि मानवाधिकार या मूल्यांवर आधारित महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवलेली रोपे आज वटवृक्ष झाली आहेत. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सुवर्णयोग असून शासन स्तरावरून अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.

शासन स्तरावरून विविध उपक्रमांची अंमलबजावणी

समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून नियोजनबद्ध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये महात्मा फुले समता शिध्याच्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूंचा संच उपलब्ध करून दिला जात आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाला बळ देण्यासाठी अल्पसंख्याक विकास, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय आणि महिला व बालविकास विभागांमार्फत विशेष अनुदान योजना, चरित्रग्रंथांचे प्रकाशन, लघुकथा आणि स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

शैक्षणिक प्रेरणा सप्ताह आणि शेती विषयक उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच समता आणि राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ साजरा केला जात असून विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महसूल लोकअदालत अभियानासोबतच जलसंवर्धन आणि शाश्वत शेतीचे उपक्रम राबवले जात आहेत. महात्मा फुले यांचे विचार वर्तमानाचा दीपस्तंभ आणि भविष्याचा मार्ग असून, या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळा, महाविद्यालयातील तरुण-तरुणी, अधिकारी आणि नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन विचार पुढे चालवावेत हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts