Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये भोंदूबाबाचा ; पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लाटले साडेसात लाख
Nashik

नाशिकमध्ये भोंदूबाबाचा ; पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लाटले साडेसात लाख

woman in white framed sunglasses and black tank top

नाशिक | आजारपण दूर करण्यासह घरात पैशाचा पाऊस पाडण्याचे खोटे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेची लाखोंची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पूजेच्या नावाखाली महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवण्यात आले होते. तसेच या अघोरी विधींसाठी मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे मागवण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणातून भोंदूबाबाने पीडित महिलेचे एकूण साडेसात लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

आजार बरे करण्याचे आमिष आणि अघोरी पूजा

पीडित महिला पनवेलची रहिवासी असून तिला अस्थमाचा त्रास होता. नाशिकच्या गंगापूर परिसरातील अरुण धोंडू पाटील याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा समज करून घेत महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. भोंदूबाबाने गाडी पाठवून महिला व तिच्या पतीच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्यांना नाशिकला आणले. दुसऱ्यांदा केलेल्या विधीनंतर आजारात सुधारणा झाल्याचा भास झाल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर भोंदूबाबाने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले आणि यासाठी मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगितले. महिलेला पनवेलहून पुन्हा गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ आणून अघोरी विधी करण्यात आला. या विधीदरम्यान महिलेचे कपडे काढून तिला पांढरे, पारदर्शक पातळ वस्त्र नेसवण्यात आले आणि तिच्या अंगावर पाणी टाकण्यात आले. मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का वापरून हा विधी करण्यात आला.

बोकडाचा बळी आणि पोलिसांत गुन्हा दाखल

या पूजेसाठी महिलेने पाच लाख रुपये दिले होते. भोंदूबाबाने सुमारे दोन तास मंत्रोच्चार करत विधी केला आणि यावेळी बोकडाचा बळी देण्यात आल्याचा आरोप आहे. घरी गेल्यावर पैशाचा पाऊस पडेल सांगून महिला व तिच्या पतीला पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून पनवेलला पाठवण्यात आले. अशा तीन विधींच्या नावाखाली एकूण साडेसात लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, ना आजार बरा झाला ना पैशाचा पाऊस पडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पैसे मागितले असता भोंदूबाबाने टाळाटाळ केली. यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतरांचीही फसवणूक झाली असल्यास पुढे येण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts