Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • त्र्यंबकेश्वरमध्ये नियोजनाचा अभाव, भाविक आणि रहिवासी अडचणीत
Nashik

त्र्यंबकेश्वरमध्ये नियोजनाचा अभाव, भाविक आणि रहिवासी अडचणीत

नाशिक | त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थासाठी विविध कामांचा धडाका सुरू आहे. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे येथील नागरी जीवनाला मोठा फटका बसला असून भाविक आणि रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी असलेला एकमेव रस्ता सध्या खोदण्यात आला आहे. त्याचवेळी गेल्या एक वर्षापासून सुरू असलेला रस्ता अद्यापही निर्माणाधीन अवस्थेतच आहे. हा रस्ता आधी पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला असता, तर ही बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती.

वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या

नगर परिषदेच्या अधिकृत बहुमजली वाहनतळ इमारतीपर्यंत वाहनांना पोहचण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे भाविकांची वाहने थेट रस्त्यावरच उभी केली जात आहेत. गजानन महाराज प्रवेश कमान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याच्या एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने तिथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील हॉटेल्ससमोर ग्राहकांची वाहने अनधिकृतपणे उभी राहत असल्यामुळे वळण घेणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे. यावर योग्य तो उपाय शोधण्याऐवजी प्रशासनाने एसटी बसेस थेट शहराबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची हेळसांड आणि नागरिकांचा रोष

बसस्थानक शहराबाहेर नेल्यामुळे त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना तब्बल दोन किलोमीटर अंतर पायी चालावे लागत आहे. तसेच ऑटोरिक्षा चालकांकडून नागरिकांची आर्थिक लूट होत असून ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेले ग्रामस्थ डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करताना दिसत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची देखील मोठी धावपळ उडत आहे. जव्हार फाटा-महादेवी मंदिर मार्गे शहरात येणारा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा आणि शहरातील नवीन स्थानकातूनच बसेस सोडाव्यात, अशी तीव्र मागणी त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांमधून केली जात आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts