Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • प्रशासन आणि तपास यंत्रणांमध्ये विश्वासार्ह एआयचा वापर गरजेचा
Maharashtra

प्रशासन आणि तपास यंत्रणांमध्ये विश्वासार्ह एआयचा वापर गरजेचा

मुंबईत पार पडलेल्या एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह महाराष्ट्र परिषदेचे दृश्य

मुंबई | शासन आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करताना विश्वासार्हता, सुरक्षितता आणि जबाबदारी यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह महाराष्ट्र’मधील परिसंवादात व्यक्त करण्यात आले. मुंबईतील परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क विभाग, महाआयटी आणि आयलाउंज मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडली. ‘बिल्डिंग ट्रस्टेड एआय : एनॅबलिंग सिक्युअर, रिस्पॉन्सिबल अँड इन्क्लुझिव्ह इंटेलिजंट गव्हर्चमेंट’ या विषयावर झालेल्या विशेष परिसंवादाचे सूत्रसंचालन डेलॉइट इंडियाचे संचालक अंशुमन सैकिया यांनी केले. या कार्यक्रमास माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध राज्यांचे प्रतिनिधी, तसेच आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

आर्थिक गुन्हे तपास आणि सायबर सुरक्षेत एआयची भूमिका

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या गंभीर फसवणूक तपास कार्यालयाचे सहसंचालक स्वप्नील बावकर यांनी आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात एआयच्या उपयुक्ततेवर भाष्य केले. शेल कंपन्यांचे जाळे, क्लिष्ट आर्थिक व्यवहार आणि कॉर्पोरेट फसवणुकीचे प्राथमिक संकेत ओळखण्यासाठी एआय उपयुक्त ठरत आहे. यामुळे मानवी श्रम कमी होऊन तपास प्रक्रियेचा वेग वाढतो. तथापि, संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या सुरक्षित आणि स्वतंत्र ऑफलाइन यंत्रणेवर आधारित एआय प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. तसेच, गुन्ह्यांमागील मानवी मानसिकता समजण्यासाठी मानवी हस्तक्षेप महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सायबर सुरक्षेबाबत बोलताना स्प्लंकचे एआय तज्ज्ञ आशुतोष सुनार यांनी सांगितले की, सायबर हल्ले अधिक गुंतागुंतीचे होत असून पारंपरिक उपायांनी मुकाबला करणे कठीण झाले आहे. एआय आधारित सुरक्षा प्रणालीद्वारे विखुरलेल्या माहितीचे एकत्रित विश्लेषण करून संभाव्य सायबर धोक्यांची पूर्वसूचना मिळवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य होते.

एआय प्रणालीसाठी स्पष्ट नियमावली आणि नियंत्रण आवश्यक

सर्व्हिसनाऊचे नवे वरिष्ठ सल्लागार राघुल श्याम रवी यांनी एआयच्या सुरक्षित वापरासाठी स्पष्ट कार्यचौकट व योग्य नियमनाची गरज अधोरेखित केली. नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना जसे नियम ठरवले जातात, तसेच एआय प्रणालीसाठीही नियमावली, नियंत्रण व्यवस्था आणि देखरेख यंत्रणा असणे गरजेचे आहे. एआयच्या माध्यमातून शासकीय सेवांचे सुलभीकरण होऊन नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा मिळू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मानवी बुद्धिमत्तेला एआय हा पर्याय नसून, अधिकारी आणि तपास यंत्रणांना अचूक निर्णय घेण्यासाठी सहाय्य करणारे हे तंत्रज्ञान आहे, असा सूर या परिषदेत उमटला.

Source: Cosmo News Desk

Related Posts