Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्हमध्ये उल्लेखनीय उपक्रमांचा सन्मान
Maharashtra

एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्हमध्ये उल्लेखनीय उपक्रमांचा सन्मान

मुंबईत पार पडलेल्या एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह सोहळ्याचे दृश्य

मुंबई | कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, डिजिटल प्रशासन, सार्वजनिक सेवा आणि डेटा विश्लेषणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील शासकीय विभाग, संस्था व व्यक्तींना ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘परिवर्तन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने, तसेच महाआयटी आणि गव्हकनेक्टच्या सहकार्याने परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये या कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना या व्यासपीठावर गौरविण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, गव्हकनेक्टचे संचालक फहीम हक आणि सहसंचालक फरहान खान यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विविध श्रेणींमधील पुरस्कार आणि विजेते

या कॉन्क्लेव्हमध्ये विविध श्रेणींनुसार संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. वैयक्तिक श्रेणीतील ‘व्हिजनरी लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार टेक्नोडिजिटल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष अमित अग्रवाल यांना एआय पायाभूत सुविधांची क्षमता, वीज उपलब्धतेची पूर्वतयारी आणि संगणकीय क्षमतेच्या अर्थकारणातील योगदानासाठी देण्यात आला. सी-डॉट संस्थेला ‘त्रिनेत्र शक्ती : एआय सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (AI-SOC) प्लॅटफॉर्म’ या प्रकल्पासाठी ‘एआय अँड सायबर सिक्युरिटी एक्सलन्स ॲवॉर्ड’ मिळाला, जो संस्थेच्या वतीने डॉ. राजकुमार उपाध्याय यांनी स्वीकारला. कर्नाटक शासनाच्या सेंटर फॉर स्मार्ट गव्हर्नन्सला ‘मंथन’ प्रकल्पासाठी, तर आंध्र प्रदेश शासनाच्या महानगरपालिका प्रशासन व नागरी विकास विभागाला ‘पुरामित्र’ उपक्रमासाठी ‘एआय-ड्रिव्हन पब्लिक सर्व्हिस इनोव्हेशन ॲवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि इतर पुरस्कार

‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन एक्सलन्स ॲवॉर्ड’ श्रेणीत राजस्थान शासनाच्या माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विभागाच्या ‘आयस्टार्ट’ उपक्रमाला आणि तेलंगणा शासनाच्या सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सच्या ‘प्रजावाणी’ उपक्रमाला पुरस्कार मिळाला. तसेच, केरळ राज्य नागरी पुरवठा महामंडळाला ‘एआय आधारित डेटा गव्हर्नन्स’ उपक्रमासाठी ‘इंटेलिजंट इंटरप्राईस ट्रान्सफॉर्मेशन ॲवॉर्ड’ जाहीर झाला. आंध्र प्रदेशच्या समाज कल्याण विभागाला ‘ज्ञानभूमी’ उपक्रमासाठी ‘टेक्नॉलॉजी फॉर सोशल इम्पॅक्ट ॲवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. डेटा ॲनालिटिक्स आणि डेटा ॲज अ सर्व्हिस (DaaS) प्रकल्पासाठी गोवा शासनाच्या वित्त विभागाला ‘स्मार्ट गव्हर्नन्स अँड डेटा इंटेलिजन्स ॲवॉर्ड’ श्रेणीत गौरविण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts