Shopping cart

Subtotal $0.00

View cartCheckout

Magazines cover a wide array subjects, including but not limited to fashion, lifestyle, health, politics, business, Entertainment, sports, science,

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • महिन्याला ९० लाखांची कमाई! त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘झटपट दर्शन’ घोटाळा उघड; मुख्य विश्वस्तालाच ठोकल्या बेड्या
Nashik

महिन्याला ९० लाखांची कमाई! त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘झटपट दर्शन’ घोटाळा उघड; मुख्य विश्वस्तालाच ठोकल्या बेड्या

Email : 5

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पैशांच्या लालसेपोटी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक करून त्यांना ‘व्हीआयपी’ (VIP) दर्शनाच्या नावाखाली तब्बल १२ हजार रुपये उकळण्याचे रॅकेट सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड मंदिराचा एक विश्वस्तच निघाला आहे. आपल्या पुतण्यांच्या आणि काही दलालांच्या मदतीने तो हे रॅकेट चालवत होता. यातून महिन्याला तब्बल ९० लाख रुपयांची बेकायदेशीर कमाई केली जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या कारवाईमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मंदिर प्रशासनात पारदर्शकतेची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts