नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वतःला अंकशास्त्रातील तज्ज्ञ समजणाऱ्या आणि ‘९’ हा शुभांक मानणाऱ्या खरातने पुत्रप्राप्तीचा खोटा दावा करून अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या अश्लील व्हिडिओची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आतापर्यंत अनेक पीडित महिला धाडसाने पुढे आल्या असून, खरात विरोधात तक्रारींचा महापूर आला आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या या काळ्या धंद्यात अनेक बड्या प्रस्थांचे कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस कसून तपास करत आहेत.







