Shopping cart

Subtotal $0.00

View cartCheckout

Magazines cover a wide array subjects, including but not limited to fashion, lifestyle, health, politics, business, Entertainment, sports, science,

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट! अहिल्यानगर, पुणे आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’; बळीराजाची चिंता वाढली
Maharashtra

महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट! अहिल्यानगर, पुणे आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’; बळीराजाची चिंता वाढली

Email : 14

एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यात राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः अहिल्यानगर, पुणे, आणि नाशिक परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. ऐन रब्बी हंगामातील पिके, कांदा आणि फळबागांच्या काढणीच्या वेळी या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts