Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • सिंहस्थाच्या नावाखाली ३५ हजार कोटींची लूट, रोहित पवारांचा आरोप
Nashik

सिंहस्थाच्या नावाखाली ३५ हजार कोटींची लूट, रोहित पवारांचा आरोप

नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू असून धर्माच्या नावावर सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा उघडा खडा टाकला आहे, असा गंभीर आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे अवघ्या हजार कोटींमध्ये कामे झाली, मग नाशिकमधील ३५ हजार कोटी नेले कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चांगल्या रस्त्यांची चाळण करून निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्यामुळे अपघातात निरपराध नागरिक देखील गेल्याचे त्यांनी सांगितले. हा पैसा सत्ताधाऱ्यांच्या बापाचा नसून जनतेचा आहे, असे सांगत या महोत्सवात केवळ नेतेच नाही तर भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

गिरीश महाजन आणि अधिकाऱ्यांवर ताशेरे

मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावचे अधिकारी आणले आहेत, नाशिकचे अधिकारी काम करू शकत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री महाजन यांच्या ओळखीच्या लोकांच्या पदरात रिंगरोडचे कॉन्ट्रॅक्ट आणि मलिदा पडत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या संपूर्ण कामामध्ये ७ ते ८ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला असून, मंत्री महाजन यांनी माहिती द्यायची नाही असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना १० दिवसांची मुदत देण्यात आली असून तोपर्यंत माहिती दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कमिशन लाटण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले ऐतिहासिक घाट पोकलेनच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

गोदावरी प्रदूषण आणि प्रत्यक्ष पाहणी

नाशिक दौऱ्यावर असताना रोहित पवार यांच्यासमोर स्थानिकांनी गोदादूषणाबाबत तक्रारींचा पाढा वाचला. रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि गांधी तलाव परिसराची त्यांनी स्वतः स्थिती जाणून घेतली. ‘नीरी’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून नदीपात्रात कॉंक्रिटिकरण केले जात असल्यामुळे नैसर्गिक जीवंत झरे बुजले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच गोदावरी नदीपात्रात विष्टा आणि ५० पट अधिक विषारी क्रोमियम मिसळत असल्याचा मुद्दाही समोर आला. पाहणी झाल्यानंतर रोहित पवार यांनी व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे दुचाकीवरून काळाराम मंदिरापर्यंत प्रवास केला आणि मंदिराच्या परिसरातील विकासकामांची पाहणी केली.

Source: Cosmo News Desk

Related Posts