Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमधील बाल कलाकारांसाठी सुवर्णसंधी; ‘नाशिक लिटिल चॅम्प्स सीझन १२’ च्या ऑडिशन्सला सुरुवात
Nashik

नाशिकमधील बाल कलाकारांसाठी सुवर्णसंधी; ‘नाशिक लिटिल चॅम्प्स सीझन १२’ च्या ऑडिशन्सला सुरुवात

नाशिक: निखिल मुळे प्रॉडक्शन्स, रॅडिश इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट (IIEM – WS) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘नाशिक लिटिल चॅम्प्स सीझन १२’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत गायन, नृत्य, वाद्यवादन आणि चित्रकला या चार विभागांच्या ऑडिशन्सला सुरुवात झाली आहे.

स्पर्धेचे विविध विभाग आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

  • नृत्य स्पर्धा (Dance Competition): या स्पर्धेसाठी केजी ते इयत्ता ४ थी आणि इयत्ता ५ वी ते १० वी असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. एकल (Solo) नृत्यासाठी ३०० रुपये आणि युगल (Duet) नृत्यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
  • वाद्यवादन स्पर्धा (Instrumental Competition): या स्पर्धेत केजी ते इयत्ता १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यासाठी २५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.
  • चित्रकला स्पर्धा (Drawing Competition): चित्रकला स्पर्धेसाठी प्लेग्रुप ते १ ली, २ री ते ४ थी आणि ५ वी ते ९ वी असे तीन गट करण्यात आले असून प्रवेश शुल्क केवळ ६० रुपये आहे.
  • गायन स्पर्धा (Singing Competition): बालगायकांसाठी गायन विभागाच्या ऑडिशन्सदेखील सुरू झाल्या आहेत.

ऑडिशन्सचे ठिकाण आणि संपर्क: इच्छुक स्पर्धकांनी व पालकांनी नावनोंदणी व ऑडिशन्ससाठी फ्लॅट नं. १२, लोटस कोर्ट अपार्टमेंट्स, हॉटेल करी लिव्हज जवळ, जनकल्याण बँकेच्या वर, जेहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ८१०८१८०७७७ किंवा ९८२२४८०७७७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Posts